Dattatreya Hosabale राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नवे सरकार्यवाह
बंगळुरु : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सहकार्यवाहपदी दत्तात्रय होसबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बंगळुरुमध्ये अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत हा निर्णय घेण्यात आला. 65 वर्षीय दत्तात्रय होसबळे हे संघाचे 2009 पासून सह-सरकार्यवाह म्हणून काम पाहत होते. दत्तात्रय होसबळे हे मूळ कर्नाटकमधील आहेत. त्यामुळे दत्तात्रय होसबळे यांनी संघाचे प्रचारक बनून पूर्णकालीन संघाचेच काम केले आहे. दत्ताजी होसबळे हे स्वतः त्यांच्या शिक्षणाच्या काळात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत कार्यरत होते आणि नंतर संघाने त्यांना जवळ जवळ 15 वर्ष अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय संघटन मंत्री म्हणून काम दिले.