Cylinders in Ujjwala Yojana : उज्ज्वला योजनेतील सिलिंडर 400 रुपयांनी स्वस्त

Continues below advertisement

केंद्र सरकारने रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला देशभरातील भगिनींना  मोठी भेट दिलीय... देशभरातील गॅस सिलेंडर सरसकट २०० रुपयांनी स्वस्त करण्यात आलेयत. त्याचसोबत, उज्ज्वला योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना गॅस सिलिंडर ४०० रुपयांनी स्वस्त मिळणारेय. महत्त्वाचं म्हणजे, देशभरात तब्बल ७५ लाख कुटुंबांना उज्ज्वला योजनेअंतर्गत मोफत नवी गॅस कनेक्शन्स दिली जाणार आहेत. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी ही घोषणा केलीय. आंतरराष्ट्रीय बाजारात नैसर्गिक वायूच्या किमती कमी झाल्या आहेत. आणि दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे, आगामी निवडणुका. येत्या डिसेंबरमध्ये ५ राज्यांमध्ये निवडणुका आहेत, तसंच एप्रिलमध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. तसेच मोदींची यंदा तिसरी लोकसभा निवडणूक असणार आहे. त्यामुळे मोदी सरकार महागाईबाबत कुठलाच धोका पत्करण्याच्या तयारीत नसल्याचं समजतंय. त्याचाच एक भाग म्हणून गॅसधारकांना दिलासा देण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा आहे. दरम्यान, ओणम आणि रक्षाबंधनाच्या निमित्ताने देशभरातील भगिनींना ही भेट असल्याचं अनुराग ठाकूर यांनी म्हटलंय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram