Delhi AIIMS : सायबर चोरांनी दिल्लीच्या एम्सकडे मागितली तब्बल 200 कोटींची खंडणी

Continues below advertisement

हॅकर्सनी ‘एम्स’कडे मागितली 200 कोटींची खंडणी; डेटामध्ये मंत्र्यांसह महत्त्वाच्या व्यक्तींची माहिती. देशातील सर्वात मोठे रुग्णालय एम्स, दिल्लीच्या सर्व्हरवर हल्ला करणाऱ्या हॅकर्स रॅन्समवेअरने क्रिप्टोकरन्सीमध्ये सुमारे २०० कोटी रुपयांची खंडणी मागितली आहे. एम्सचे सर्व्हर सोमवारी सलग सहाव्या दिवशी डाऊन होते. त्यात माजी पंतप्रधान, मंत्री, नोकरशहा, न्यायाधीशांसह अनेक अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचा (व्हीआयपी) डेटा साठवलेला आहे. हॅकिंगमुळे सुमारे ३-४ कोटी रुग्णांचा डेटा लीक होण्याची भीती आहे. पोलिसांनी २५ नोव्हेंबरला बळजबरी वसुली, सायबर दहशतवादाअंतर्गत गुन्हा दाखल केला होता.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram