Crypto Currency In India : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात क्रिप्टोकरन्सी विधेयक सादर होणार
Continues below advertisement
नवी दिल्ली : संसदेचे हिवाळी अधिवेशन येत्या 29 नोव्हेंबरपासून सुरु होणार असून त्यामध्ये एकूण 26 विधेयकं सादर करण्याची तयारी सरकारकडून करण्यात आली आहे. यामध्ये क्रिप्टोकरन्सीचे विधेयक सादर होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे येत्या हिवाळी अधिवेशनात क्रिप्टोकरन्सीवर व्यापक चर्चा होणार आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'सिडनी डॉयलॉग'मध्ये बोलताना जगभरातील देशांना क्रिप्टोकरन्सीवर नियंत्रण आणण्याचं आवाहन केलं होतं.
Continues below advertisement