Sextortion in Mumbai : हनी ट्रॅपचा विळखा, वेळीच ओळखा! सेवानिवृत्त प्राचार्याला फसवण्याचा प्रकार

एका सेवानिवृत्त प्राचार्याचे अश्लील व्हीडिओ बनवून व्हायरल करण्याची धमकी देण्याची घटना घडलीय. याविरोधात खार पोलिसांमध्ये तक्रार देखील करण्यात आली. सदर पीडित हे ७७ वर्षांच्या असून त्यांच्याकडे व्हीडिओ बनवल्यानंतर व्हायरल करण्याच्या धमकीनं खंडणी देखील मागण्यात आली. तक्रारदार प्राचार्यांना ८ नोव्हेंबरला फेसबूकवरुन एका महिलेनं मेसेज केला. त्यावेळी त्या महिलेनं प्रत्यक्षात बोलायचं सांगून दुरध्वनी क्रमांकाची मागणी केली. मात्र स्वतःहून या महिलेनं स्वतःचा मोबाईल क्रमांक पाठवला आणि त्यांच्याकडेही मोबाईल नंबरची मागणी केली. यावेळी तक्रारदाराने मोबाईल क्रमांक दिला असता त्या महिलेने पुढे दोन ते तीन दिवस व्हॉट्सअ‍ॅपवर संदेश पाठवले. पण तक्रारदारांनी प्रतिसाद दिला नाही. अखेर तिने १२ नोव्हेंबरला तक्रारदार यांना व्हिडिओ कॉल केला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola