Covid Vaccine: लवकरच नाकाद्वारे लस मिळणार, कोरोनाविरोधातील लढ्याला मोठं यश ABP Majha
भारताच्या कोरोनाविरोधी लढ्याला मोठं बळ मिळणार आहे. लहान मुलांचं लसीकरण आणि बूस्टर डोसबाबत घोषणा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोन नव्या औषधांबाबत देशवासियांना आशेचा किरण दाखवलाय. भारतात लवकरच नाकाद्वारे दिली जाणारी लस आणि जगातील पहिली डीएनडी लस उपलब्ध होणार आहे माहिती पंतप्रधान मोदींनी दिलीय. नाकाद्वारे दिली जाणारी लस अर्थात नेझल स्प्रेची चाचणी सध्या सुरु आहे. भारत बायोटेकने या लशीच्या वापरासाठी परवानगी मागितलीय.नाकाद्वारे लस दिल्याने ती थेट फुफुसांपर्यंत पोहोचते. त्यामुळे ती जास्त आणि लवकर परिणाम करते असं बोललं जातं. दुसरीकडे झायडस कॅडिला या कंपनीकडून पहिली डीएनए लस विकसित करण्यात येत असून ती लवकरच उपलब्ध होणार आहे. सुईविना देण्यात येणारी ही लस असेल. त्यामुळे ओमायक्रॉनचा धोका वाढत असताना या दोन नव्या लशी भारतासाठी गुडन्यूज म्हणाव्या लागतील.