Covaxin and Covishield च्या मिक्स डोस अधिक परिणामकारक; ICMR च्या अभ्यासातून स्पष्ट ABP Majha

Continues below advertisement

नवी दिल्ली : कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड या दोन लसींच्या मिक्स डोसचा परिणाम अधिक चांगला येत असून त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती अधिक चांगली होते असं इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (ICMR) ताज्या अभ्यासातून स्पष्ट झालं आहे. दोन वेगवेगळ्या लसींचे डोस घेऊ नका असं या आधी सरकारकडून आवाहन करण्यात आलं होतं. आता ICMR च्या ताज्या अभ्यासानुसार, या दोन लसींचे 'मिक्सिंग अॅन्ड मॅचिंग' अधिक चांगला परिणाम दाखवतात असं सांगण्यात येत आहे. 

महत्वाचं म्हणजे दोन वेगवेगळ्या लसींचे डोस घेणं हे अधिक सुरक्षित असल्याचंही आयसीएमआरने आपल्या या अभ्यासात सांगितलं आहे. या आधी देशातील लसीकरणाच्या कार्यक्रमामध्ये लसीचा तूटवडा निर्माण झाला असताना उपलब्ध असलेल्या दुसऱ्या कंपनीची लस घेता येईल का अशी चाचपणी सुरु होती. पण त्यावेळी दोन वेगवेगळ्या लसीचे डोस घेऊ नका, त्यामुळे शरीरावर दुष्परिणाम होण्याची जास्त शक्यता असते असं सरकारकडून आवाहन करण्यात आलं होतं.

आता आयसीएमआरच्या या ताज्या अभ्यासामुळे दोन वेगवेगळ्या लसी एकत्रित वापरता येतील असं दिसून आलं आहे. कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड या दोन लसींचे प्रत्येकी एक डोस घेतले असता ते अधिक सुरक्षित आहेत आणि त्यामुळे रोगप्रतिकारक शक्तीत अधिक वाढ होईल असं सांगण्यात आलं आहे. 

त्या आधी एका अभ्यासातून आयसीएमआरने सांगितलं होतं की, कोरोनाच्या लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तर मृत्यूचा धोका 95 टक्क्यांपर्यंत कमी होतो. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram