Covid-19 | देशात एका दिवसात 11 हजारांहून अधिक कोरोना बाधित; भारतातील रुग्णांची संख्या 3 लाख पार
भारतात कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या तीन लाखांच्या पार पोहोचली आहे. मागील 24 तासांमध्ये सर्वाधिक 11458 कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. तर 386 लोकांचा मृत्यू झाला आहे. देशात सलग 9व्या दिवशी 9,500 हून अधिक कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत 3 लाख 08 हजार 993 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यामधील 8884 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत एक लाख 54 हजार लोक कोरोनामुक्त झाले आहेत.