RBI Governor | रिव्हर्स रेपो रेटमध्ये कपात, मंदीतून सावरण्यासाठी शक्तिकांत दास यांच्या महत्त्वाच्या घोषणा

Continues below advertisement
आरबीआयकडून रिव्हर्स रेपो रेटमध्ये कपात करण्यात आली असून 25 बेसिस पॉईंटने कमी करण्यात आला आहे. आता हा रिव्हर्स रेपो रेट 4 वरून 3.75  टक्क्यांवर आला आहे. यासोबत आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी अनेक महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. यावेळी आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की, संपूर्ण जगावर मंदीचं सावट आहे. कोरोनामुळे जगभरातील बाजार कोसळले आहेत. संपूर्ण विश्वात अर्थव्यवस्था वाईट स्थितीत आहे. मंदीच्या संकटाशी लढण्याचा आरबीआयचा प्रयत्न सुरु आहे, असं शक्तिकांत दास यांनी म्हटलं आहे. सध्या मानवतेसमोर कोरोना व्हायरसचं संकट आहे. या परिस्थितीत आर्थिक नुकसान कमीत कमी व्हावं यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत, असं दास यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram