RBI Governor | रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांची आज पत्रकार परिषद, कोणती घोषणा करणार?
Continues below advertisement
देशभरात कोरोना व्हायरसचा वाढता प्रादूर्भाव पाहायला मिळत आहे. अशातच रिझर्व बँक ऑफ इंडिया (RBI)चे गवर्नर शक्तिकांत दास आज सकाळी 10 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ते एखादी मोठी घोषणा करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे देशातील उद्योगधंदे बंद आहेत. अशातच अनेक आर्थिक अडचणींना समोरं जावं लागत असून भविष्यातही आर्थिक मंदीची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे या परिस्थितीशी सामना करण्यासाठी रिझर्व बँक ऑफ इंडिया (Reserve Bank of India) काय घोषणा करणार याकडे संपूर्ण देशाचं लक्षं लागलं आहे.
Continues below advertisement