Coronavirus | भारतात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 28 वर : डॉ. हर्षवर्धन
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
04 Mar 2020 06:42 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
जगभरात पसरलेला कोरोना व्हायरसमुळे भारतातही दहशतीचं वातावरण आहे. देशातील कोरोना व्हायरसग्रस्त रुग्णांची संख्या 28 वर पोहोचल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी दिली आहे. इटलीमधून भारतात पर्यटनासाठी आलेल्या एका ग्रुपमधील 16 जण कोरोनाग्रस्त आहेत. तर त्यांच्या संपर्कात आलेला आणि त्यांच्यासोबत असलेला एक भारतीय चालकही कोरोनाबाधित आहे. याशिवाय दिल्लीतील एक, हैदराबादमधील एक आणि आग्र्यातील सहा जण कोरोनाग्रस्त आहे. दिल्लीतील व्यक्तीच्या संपर्कात आल्यानेच आग्र्यातील सहा जणांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं समोर आलं आहे. हे सहा जण त्या व्यक्तीचे नातेवाईक आहेत.