Farmers Protest | काँग्रेस नेत्यांचा मोर्चा पोलिसांनी अडवला; प्रियंका गांधींसह काही खासदार ताब्यात

Continues below advertisement

अर्थात कृषी कायद्याविरोधात देशात सुरु असणाऱ्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी Congress काँग्रेसच्या शिष्टमंडळानं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या भेटीला जाण्याचा निर्णय़ घेतला. याच धर्तीवर काँग्रेस कार्यकर्त्यांनी धडक मोर्चाही काढला. ही एकंदर परिस्थिती पाहता काँग्रेस मुख्यालयाबाहेर कलम 144 लागू करण्यात आलं आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यात पुढाकारानं सहभाग घेताना दिसले.

दरम्यान, ज्या पद्धतीनं काँग्रेसनं आंदोलनाचा कार्यक्रम आखला होता, त्या पार्श्वभूमीवर पोलीसही त्यांच्या बळाचा वापर करताना दिसत आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी, गुलाम नबी आझाद आणि अधिररंजन चौधरी यांना आंदोलनाची, राष्ट्रपतींच्या भेटीची परवानगी होती. पण, काँग्रेस मुख्यालयात जमणाऱ्या खासदारांचा अंदाज पाहता तिथं पोलिसांनी या भागात कलम 144 लागू केलं.

आंदोलनकर्ते काँग्रेस खासदार विजय चौकमध्येच थांबणार होते. पण, त्यांना मुख्यालयातच थांबवण्यात आलं. पोलिसांच्या बळावर ही कारवाई करण्यात येत असल्यामुळं खासदारांमध्ये कमालीचा संताप आणि नाराजी पाहायला मिळत आहेत. मुख्य म्हणजे पोलिसांनी काँग्रेस आंदोनाच्या धर्तीवर सदर भागात कडेकोट सुरक्षा व्यवस्था केली होती. ज्यानंतर काही खासदारांना पोलिसांनी ताब्यातही घेतलं. एएनआयच्या वृत्तानुसार प्रियंका गांधींनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram