Sonia Gandhi यांनी बोलावलेल्या विरोधी पक्ष नेत्यांच्या बैठकीत CM Uddhav Thackeray उपस्थित राहणार
Continues below advertisement
देशात विरोधी पक्षांची एकजूट करण्याचे प्रयत्न वेगवेगळ्या पातळीवर सुरू आहेत. त्यात 20 ऑगस्टला यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधींनी सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. विशेष म्हणजे या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेदेखिल उपस्थित राहणार आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ही माहिती दिली. पेगॅसस आणि कृषी कायद्याविरोधात काँग्रेससह अन्य पक्ष आक्रमक पवित्रा घेणार आहेत.
Continues below advertisement