Ayodhya Ram Mandir Inauguration :जो राम का नहीं वो किसी काम का नहीं,मुख्यमंत्र्यांची विरोधकांवर टीका
Ayodhya Ram Mandir Inauguration : जो राम का नही वो किसी काम का नही, मुख्यमंत्र्यांची विरोधकांवर टीका
सर्व मंत्रीमंडळासोबत अयोेध्येला दर्शनाला जाणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया, तर काही लोकांनी प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर बहिष्कार घातला, त्यांना सदबुद्धी दिली पाहिजे, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला.
Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha PM Narendra Modi Speech : राम म्हणजे आग नाही तर ती ऊर्जा आहे. राम म्हणजे भारताचा विचार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi Speech Ayodhya) यांनी म्हटले. अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठापनेनंतर पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात प्रभू श्रीरामाचा अर्थ उलगडून सांगताना भारतीय संस्कृतीमधील त्याचे महत्त्व अधोरेखित केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'सियावर रामचंद्र की जय... असे म्हणत आपल्या भाषणाची सुरुवात केली. आज आपले राम आले आहेत. मला खूप काही बोलायचं आहे, पण कंठ दाठले आहेत. आजचा क्षण हा अलौकीक आणि पवित्र असल्याची भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली. 22 जानेवारी 2024 ही फक्त कॅलेंडरवरील तारीख नाही. नव्या कालचक्राचा उगम आहे. आजची वेळ सामान्य नाही. हजारो वर्षानंतरही आजच्या दिवसाची चर्चा होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.