CM Eknath Shinde Ayodhya Daura: अयोध्येत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दौऱ्यासाठी कशी आहे तयारी?
CM Eknath Shinde Ayodhya Daura: अयोध्येत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या तयारीसाठी जोरदार तयारी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पूर्वनियोजित आणि बहुचर्चित अयोध्या दौरा सुरू झालाय. एकनाथ शिंदे यांचा हा दौरा मुंबई ते अयोध्या व्हाया लखनौ असा असणार असून, ते आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे स्नेहभोजन घेत पाहुणचार स्वीकारणार आहेत. एकनाथ शिंदे यांचा आजचा मुक्काम लखनौमध्ये असणार आहे. काल रेल्वेने अनेक कार्यकर्ते अयोध्येकडे रवाना झाल्यानंतर शिंदे आज मुंबईतून रवाना झाले आहेत. दरम्यान,अयोध्येच्या या दौऱ्यात शिवसेनेचे सर्व आमदार आणि खासदारही सहभागी झाले आहेत. महत्त्वाचं म्हणजे, महाराष्ट्राच्या राजकारणाचा पट तीनशे साठ अंशांत वळवून, सत्ता स्थापन करून आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर शिंदे पहिल्यांदाच अयोध्येला जात आहेत. या सगळ्यात एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, याआधी शिंदे अयोध्येला गेले तेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते आणि शिंदे ठाकरेंसोबत अयोध्येला गेले होते. आता मात्र शिंदे ठाकरेंशिवाय अयोध्येला जात आहेत.