Taiwan : तैवान प्रकरणावर चीन आणि अमेरिका युद्धाच्या उंबरठ्यावर? काय दिलाय अमेरिकेनं चीनला इशारा ?
तैवान चीनच्या समुद्री सीमेपासून जेमतेम शंभर मैल अंतरावरचं स्वतंत्र बेट आहे. हाच देश आकारानं महाराष्ट्रापेक्षा खूपच छोटा आहे. परंतु आर्थिक आणि औद्योगिक विकासाच्या बाबतीत प्रगतीत सुसाट आहे. खंडप्राय पसरलेल्या चीनच्या मुख्य भूमीपासून तैवान भौगोलिकदृष्ट्या वेगळा आहे. तैवानची लोकसंख्या साधारण दीड कोटी आहे. त्यातच आता तैवान हा चीनचाच भाग असल्याचे दावे पुन्हा एकदा सुरु झाले आहेत. तैवाननं चर्चेतून मार्ग काढावा नाहीतर बळाचा वापर करून तैवानवर ताबा मिळवण्याचा निर्धार चीनी प्रशासनाकडून केला गेला आहे तर आता अमेरिकेनं ही या वादा उडी घेत थेट चीनला इशारा दिला आहे.