OBC Reservation : ...अन्यथा ओबीसी समाज उठाव केल्याशिवाय राहणार नाही : Chhagan Bhujbal
ओबीसींचं राजकीय आरक्षणाला स्थगिती सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिल्यानंतर केंद्र सरकार आता पुनर्विचार याचिका दाखल करण्याच्या विचारात आहे. दुसरीकडे दिल्लीत आज देशभरातल्या ओबीसी नेत्यांची बैठक होतेय. या बैठकीसाठी राज्याचे मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ आज दिल्लीत आहेत. दिल्लीतल्या तालकटोरा स्टेडियममध्ये या बैठकीला शरद यादव, लालूप्रसाद यादव आणि सीताराम येचुरी असे नेते उपस्थित राहणार आहेत.