Project Cheetah : नामिबियामधून आणलेले आठ चित्ते हेलिकॉप्टरमधून Kuno National park मध्ये सोडणार

Project Cheetah : भारतात 70 वर्षांनंतर 'चिते की चाल' दिसणार आहे. नामिबियामधून आठ चित्ते आज भारतात दाखल झाले आहेत. नामिबिया येथून विशेष विमानानं आफ्रिकन आठ चित्त्यांचं भारतात आगमन झालं आहे. हे आठ चित्ते मध्य प्रदेशच्या कुनो नॅशनल पार्कमध्ये ठेवण्यात येणार आहेत. चित्ते नामिबियाहून सुमारे आठ हजार किलोमीटरचा प्रवास करुन भारतात दाखल झाले आहेत. 1952 साली भारतातून चित्ते नामशेष झाले होते. सर्वोच्च न्यायालयाने 2020 साली भारतात चित्ते आणण्याची परवानगी दिली. भारतातून चित्ते नामशेष झाल्यानंतर 1970 साली देशात आणण्यासाठी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी प्रयत्न सुरु केले होते. मात्र तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने यासाठी परवानगी नाकारली होती. त्यानंतर यंदा 2022 मध्ये हा प्रोजेक्ट चित्ता पूर्णत्वास आला आहे. या प्रोजेक्ट चित्ता साठी भारत सरकारने सुमारे 90 ते 92 कोटी खर्च केल्याचं बोललं जात आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola