Central Railway: रेल्वेकडून हॅड हेल्ड टर्मिनल प्रणाली विकसित ABP Majha
आता ट्रेनमध्ये बसूनही तिकीट आरक्षित करता येणार आहे. रेल्वे प्रशासनानं हँड हेल्ड टर्मिनल नावाचं नवं यंत्र विकसित केलंय. तिकीट तपासनीसाच्या हातात असलेल्या या एचएचटी यंत्रातून पुढील स्थानकात उपलब्ध असलेल्या आरक्षित तिकीटांची माहिती मिळणार आहे. या यंत्रामुळे आता तिकीट तपासनीसाचीही आरक्षणाच्या तक्त्यांमधून सुटका होणार आहे. एका क्लिकवर त्यांना सर्व माहिती मिळू शकणार आहे