Govt largest shareholder in Vodafone Idea : व्होडाफोन-आयडिया कंपनीत केंद्र सरकारचा सर्वाधिक हिस्सा
Continues below advertisement
हजारो कोटींच्या थकबाकीच्या डोंगराखाली अडकलेल्या व्होडाफोन-आयडिया कंपनीला, संकटातून बाहेर पडण्यासाठी मोठा मार्ग सापडलाय. व्होडाफोन-आयडिया कंपनीत आता केंद्र सरकारची सर्वात मोठी भागिदारी असणार आहे.. कर आणि इतर स्वरुपाच्या थकबाकीला भागिदारीत रुपांतरीत करण्याच्या प्रस्तावाला व्होडाफोन-आयडियाच्या संचालक मंडळानं हिरवा कंदील दाखवलाय. त्यामुळं व्होडाफोन-आयडिया कंपनीत सरकारची ३६ टक्के भागिदारी असणार आहे.. व्होडाफोन ग्रूपचा हिस्सा २८.५ टक्के तर आदित्य बिर्ला ग्रूपच्या आयडियाचा हिस्सा १७.८ टक्के असणार आहे,, दरम्यान या वृत्तानंतर व्हाडाफोन आयडियाच्या शेअर्समध्ये १७ टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली. सरकारची भागीदारी गुंतवणूकदारांना आवडलेली नसल्याचं समजतंय.
Continues below advertisement