देशभरातील 'Single Use Plastic' वापराला 1 जुलै 2022 पासून बंदी, केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची घोषणा

आपल्या दैनंदिन वापरातील सिंगल यूज प्लॅस्टिक लवकरच हद्दपार होणार आहे... कारण देशभरातील सिंगल यूज प्लॅस्टिक वापराला १ जुलै २०२२ पासून बंदी लावण्याची केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं घोषणा केली. त्यानुसार देशभरातील प्लॅस्टिक प्लेट्स, कप, मिठाईचे डबे, सिगारेटच्या पाकिटावरील प्लॅस्टिक आणि तत्सम इतर प्लॅस्टिकवर बंदी घालण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयानं काल अधिसूचना जाहीर केली. त्यामुळे आता सिंगल यूज ऑफ प्लॅस्टिकच्या वापराला, उत्पादनाला, आयातीला, साठवणुकीला आणि विक्री करण्यावर बंदी घालण्यात आली. या निर्णयाची अंमलबजावणी न करणाऱयांविरोधात कारवाई करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola