Rajabhau Waje : एकाही कुंभमेळा नियोजन बैठकीला मला बोलवलं नाही, राजाभाऊ वाजे नाराज

Rajabhau Waje : एकाही कुंभमेळा नियोजन बैठकीला मला बोलवलं नाही, राजाभाऊ वाजे नाराज
आत्तापर्यंत झालेल्या एकही कुंभमेळा नियोजन बैठकीला बोलवले नाही  खासदार राजाभाऊ वाजे यांनी केली नाराजी व्यक्त  विरोधी पक्षातील खासदार असल्याने बैठकीला जर बोलवत नसतील तर हे चुकीचं- राजाभाऊ  लोकप्रतिनिधी म्हणून आमचे देखील म्हणणं ऐकून घ्यावे. 

हे ही वाचा..

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नीलकंठेश्वर पॅनलची बहुमताकडे वाटचाल सुरु आहे. त्यामुळे अजित पवारांच्या Ajit Pawar) समर्थनक कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत रस्त्यावर एकच जल्लोष सुरु केला आहे. सध्या निळकंठेश्वर पॅनलच्या (NilKantheshwar Panel) समर्थकांकडून जोरदार घोषणबाजीला सुरुवात झाली आहे. 'अरे सांगवीला सांगा, माळेगावला सांगा, चेअरमन आमचा अजितदादा.... अरे एकच वादा, अजितदादा... आला रे आला दादाच आला', अशा घोषणांनी माळेगाव कारखान्याचा परिसर दणाणून गेला आहे.  (Malegaon Election Results 2025)

अजित पवार हे स्वत: माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यांनी बारामतीत ठाण मांडून या निवडणुकीसाठी प्रचार केला होता. तसेच अजितदादांनी माळेगाव साखर कारखान्यासाठी 500 कोटी रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा केली होती. याचा अपेक्षित परिणाम मतदारांवर झालेला दिसत आहे. आज मतमोजणीच्या दुसऱ्या दिवशी अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखालील निळकंठेश्वर पॅनेलची सरशी होताना दिसत आहे. अजित पवार यांच्या निळकंठेश्वर पॅनल यांच्यासमोर शरद पवार आणि चंद्रराव तावरे यांची पॅनेल्स रिंगणात होती. मात्र, अजित पवार यांच्या पॅनेलला एकहाती सत्ता मिळण्याचे संकेत मिळत आहेत. सध्या अजित पवार यांच्या पॅनलचे तीन उमेदवार विजय घोषित करण्यात आले आहेत. तर उर्वरित जागांवरही बहुतांश ठिकाणी अजित पवार यांच्याच पॅनलचे उमेदवार आघाडीवर आहेत. त्यामुळे निळकंठेश्वर पॅनेलला सहजपणे बहुमत मिळेल, असा अंदाज आहे. 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola