CBSE Board 2021 Date Sheet Released | दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर

Continues below advertisement

नवी दिल्ली: CBSE बोर्डच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावी परीक्षांच्या तारखा जाहीर झाली असून त्या दहावीची आणि बारावीची परीक्षा 4 मे ते 11 जून या दरम्यान घेण्यात येत आहेत. या परीक्षेचे वेळापत्रक बोर्डच्या cbse.gov.in या संकेत स्थळावर जाहीर करण्यात आले असून विद्यार्थी आणि पालकांना त्या ठिकाणी परीक्षेसंबंधी सर्व माहिती मिळेल.

cbse.gov.in या वेबसाइटवर भेट दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी दहावी आणि बारावी अशा दोन पर्यायापैकी एका पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर स्क्रीनवर संपूर्ण माहिती दिसू शकेल. ती माहिती पीडीएफ फॉरमॅटमध्येही डाऊनलोड करणे शक्य आहे.

देशभरातील विविध राज्यातील दहावी आणि बारावीसाठी CBSE बोर्डच्या वतीनं परीक्षा घेण्यात येतात. केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरीयाल यांनी सांगितलं होतं की 2 फेब्रुवारीला दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात येतील. त्यानुसार आज वेळापत्रकाची घोषणा करण्याता आली आहे. त्यानुसार दहावीच्या परीक्षा या 4 मे ते 10 जून दरम्यान तर बारावीची परीक्षा ही 4 मे ते 11 जून या दरम्यान होणार आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram