Car Price Hike: रशिया युक्रेन युद्धाचा परिणाम, चारचाकी वाहनं महागली ABP Majha
Continues below advertisement
रशिया-युक्रेन युद्धाचा परिमाण आता चारचाकी वाहनांच्या किमतीवरही होत असल्याचं पाहायला मिळत आहे.. युद्धामुळे वाहनासाठी लागणाऱ्या सुट्या भागांचा पुरवठा विस्कळीत झाला आहे.. त्यामुळे सुट्या भागांचे दर वाढले आहेत.. या खर्चाची भरपाई करण्यासाठी वाहन निमिर्ती करणाऱ्या कंपन्यांनी चारचाकी वाहनांचा दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे...आलिशान कारची निर्मिती करणाऱ्या मर्सिडीज-बेंझने त्यांच्या सर्व मॉडेल्सच्या किमतीत ३ टक्क्यांपर्यंत वाढवल्या आहेत. त्यामुळे मर्सिडीजच्या कार किमान ५० हजार रुपये ते ५ लाखांपर्यंत महाग होणार आहेत. १ एप्रिलपासून ही नवी दरवाढ लागू करण्यात येणार आहे..मर्सिडीजपाठोपाठ टाटा मोटर्स, मारुती सुझुकी आणि स्कोडानेही त्यांच्या वाहनांच्या किमती वाढवण्य़ाचा निर्णय घेतलाय...
Continues below advertisement
Tags :
Disruption Russia-Ukraine War Scale Four-wheeler Spare Parts Supply Reimbursement Vehicle Manufacturing