Budget 2024 : भारत वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था, 10 वर्षात 25 कोटी लोक गरिबीतून बाहेर : राष्ट्रपती

Continues below advertisement

Budget 2024 : भारत सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था, 10 वर्षात 25 कोटी लोक गरिबीतून बाहेर : राष्ट्रपती
Budget 2024: देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Minister Nirmala Sitharaman) या उद्या म्हणजे 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यापूर्वी आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला औपचारिकपणे सुरुवात झाली. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांनी संसदेत अर्थसंकल्पासंदर्भात खासदारांना संबोधीत केलं. मागील वर्ष भारतीय अर्थव्यवस्थेसाठी चांगले गेले आहे. भारत सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून उदयास आला असल्याचे राष्ट्रपती  द्रौपदी मुर्मू म्हणाल्या.  तसेच गेल्या 10 वर्षात 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढल्याचेही त्या म्हणाल्या. जम्मू-काश्मीरमधील आरक्षणामुळं राज्याच्या विकासाला गती मिळेल, असंही त्यांनी सांगितलं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram