Assam Boat Collision: आसाममधील ब्रह्मपुत्रा नदीत दोन बोटींमध्ये टक्कर, 50 जण बचावले, तर 70 जण अजूनही बेपत्ता
Continues below advertisement
बुधवारी आसाममधील ब्रह्मपुत्रा नदीत दोन बोटींची टक्कर झाली. या दोन्ही बोटींमध्ये सुमारे 120 लोक होते. एनडीआरएफचे डेप्युटी कमांडंट पी. श्रीवास्तव यांनी सांगितले की, राज्य अहवालानुसार आतापर्यंत 50 लोकांना वाचवण्यात आले आहे, तर 70 लोक अजूनही बेपत्ता आहेत. तर जोरहाटच्या एसपींनी एका व्यक्तीच्या मृत्यूची पुष्टी केली असून बचावकार्य सुरू आहे. दरम्यान, या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रह्मपुत्रा नदीतील अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, सर्व प्रवाशांना वाचवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले जात आहेत.
Continues below advertisement
Tags :
Boat Accident