India-Nepal Border | भारत-नेपाळ सीमेवर नेपाळ सशस्त्र दलाचा अंदाधुंद गोळीबार,भारतीय शेतकऱ्याचा मृत्यू
भारत आणि नेपाळमध्ये सीमेवरुन वाद सुरु आहे, अशाच तणावाच्या वातावरणात भारत-नेपाळ सीमेवर नेपाळ सशस्त्र दलाकडून अंदाधुंद गोळीबार करण्यात आलाय. बिहारमधील सीतामढी गावात करण्यात आलेल्या या गोळीबारात शेतात काम करणाऱ्या एका भारतीयाचा मृत्यू झालाय तर दोन जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. या घटनेनंतर भारत-नेपाळ सीमेवर तणावाचं वातावरण निर्माण झालंय.