Rajesh Tope PC | धनंजय मुंडे यांची प्रकृती चांगली, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती #Coronavirus
मुंबई : राज्यात कोरोनाचा संसर्ग आता सरकारमधील मंत्री आणि मंत्रालयात पसरताना दिसत आहे. महाविकास आघाडी सरकारमधील सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. धनंजय मुंडे हे मंत्रिमंडळाच्या बैठकीला आणि राष्ट्रावादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनाला हजर होते. त्यामुळे मंत्रिमंडळातील आणि विशेषतः राष्ट्रवादीतील काही नेत्यांना संसर्गचा धोका निर्माण झाला आहे. मात्र, या दोन्ही ठिकाणी सर्व नियमांचे पालन करण्यात आले होते. तरीही कोणालाही लक्षणे आढळल्यास त्वरीत कोरोना चाचणी करण्यात येईल, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
Tags :
Dhananjay Munde Corona Corona Patient Recovery Dhananjay Munde Rajesh Tope Corona Corona Virus