Railway Tickets | रेल्वेच्या ई-तिकीटाचा काळा बाजार, अतिरेक्यांना फंडिंग? | ABP Majha

Continues below advertisement
ब्लॅकनं तिकीट खरेदी केल्यानं तुमचा पैसा हा देशातील अतिरेकी घटनांसाठी वापरला जात असल्याची शक्यता आहे. कारण आरपीएफनं ई-तिकीटांमध्ये काळाबाजार करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला आहे. त्यातील २७ जणांना आरपीएफ पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. आणि ही टोळी ब्लॅक तिकीटांचा पैसा अतिरेक्यांच्या मदतीसाठी वापरत असल्याचं समोर आलंय. तरी, या टोळीचा मास्टरमाईंड दुबईत असल्याची शंका व्यक्त होतेय. आतापर्यंत तपासात दर महिन्याला ही टोळी काळाबाजारातून १५ कोटींची कमाई करत असल्याची माहिती मिळतेय. तरी, आता तपास यंत्रणा गुरुजी नामक व्यक्तीचा शोध घेत आहे. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram