Mahul Residents | अतिप्रदूषणग्रस्त माहुलवासीयांना 1 फेब्रुवारीपर्यंत 300 घरं मिळणार! | ABP Majha
Continues below advertisement
प्रदूषणाच्या विळख्यात अडकलेल्या माहुलवासीयांना राज्य सरकारने काहीसा दिलासा दिला आहे. येथील अतिप्रदूषणग्रस्त प्रकल्पबाधितांसाठी ३०० घरे लवकरच हस्तांतरित करण्यात येणार आहेत. गृहनिर्माण मंत्री आणि पर्यावरण मंत्री यांच्या बैठकीत हा निर्णय झाला. अतिप्रदूषणग्रस्त माहुलवासीयांचं पुढच्या 10 दिवसात होणार नव्या घरात स्थलांतरण होणार आहे. तर उर्वरित कुटुंबांच्या पुनर्वसनासाठीही लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. एबीपी माझानं यासंदर्भात बातमी दाखवली होती. त्यानंतर 300 घरांमध्ये अतिप्रदुषीत भागातील कुटुंबांचे तातडीने पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
Continues below advertisement