Bipin Rawat | लष्कराच्या तिन्ही दलांमध्ये समन्वय ठेवण्याची जबाबदारी : बिपीन रावत | ABP Majha

राजकारणाशी लष्कराचा संबंध नाही असं विधान देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत यांनी केलंय. सीडीएस पदाची सूत्रं स्वीकारण्याआधी त्यांनी देशवासियांशी संवाद साधला. यावेळी लष्कराच्या तिन्ही दलांमध्ये समन्वय ठेवण्याची जबाबदारी असून तिन्ही दल एका टीमप्रमाणे काम करतील असंही रावत म्हणालेत. तत्पूर्वी रावत यांना लष्कराकडून गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. दोन दिवसांपूर्वी रावत यांची चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून नियुक्ती करण्यात आलीय.
'फोर स्टार' जनरलशी समकक्ष असे हे पद आहे. तिनही सैन्य दलात समन्वय राखण्याची जबाबदारी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफवर असेल.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola