Biparjoy Cyclone: बिपरजाॅय चक्रीवादळामुळे 74 हजार नागरिकांचं तात्पुरतं स्थलांतर
Continues below advertisement
Biparjoy Cyclone: बिपरजाॅय चक्रीवादळामुळे 74 हजार नागरिकांचं तात्पुरतं स्थलांतर.बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातमधील जखाऊ पोर्टजवळून जाण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास ताशी १२५-१३५ किलोमीटर वाऱ्याच्या वेगासह जमिनीवर धडकणार असल्याची माहिती आहे. त्यामुळं कच्ची घरं आणि बांधकामं कोसळू शकतात, झाडं पडू शकतात आणि वीजपुरवठ्यावरही परिणाम होण्याची चिन्हं आहेत. मुसळधार पावसाचा रस्ते, दळणवळण आणि कनेक्टिव्हिटीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement