Bihar Election Results 2020 | विजयी उमेदवारांना पराभूत घोषित केलं, यादी जाहीर करुन राजदचा आरोप
Continues below advertisement
बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणी आणि निकालात गडबड होत असल्याचा आरोप राष्ट्रीय जनता दलानं केला आहे. जिंकलेल्या उमेदवारांना प्रमाणपत्रं दिली जात नाही, असाही आरोप राजदने केला आहे. विजयी उमेदवारांना पराभूत घोषित केलं असा आरोप राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी केला आहे. एवढचं नाही तर नितीश कुमार हे मतमोजणी प्रक्रियेवर दबाव टाकत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात तक्रार करण्यासाठी राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसचं एक शिष्ट मंडळ निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहचलं आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे मतमोजणीच्या प्रक्रियेवर दबाव टाकत आहेत असा आरोप देखील या शिष्टमंडळाने केला आहे.
Continues below advertisement