Bihar Election 2020 | मताचा वापर करुन लोक बदल नक्कीच घडवून आणतील : तेजस्वी यादव

Continues below advertisement
Bihar Election 2020 | बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आज एकूण 17 जिल्ह्यातील 94 विधानसभा जागांसाठी मतदान पार पडत आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे, आज राष्ट्रीय जनता दल अर्थात RJDचे नेते तेजस्वी यादव आणि तेजप्रताप यादव यांचं भविष्यही मतपेटीत बंद होणार आहे. या टप्प्यात एकूण 1463 उमेदवार नशीब आजमावत आहेत. बिहार निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्यात आज पूर्व चंपारण, पश्चिम चंपारण, शिवहर, सीतामढी, मधुबनी, दरभंगा, मुजफ्फरपूर, गोपालगंज, सीवान, छपरा, वैशाली, समस्तीपूर, बेगूसराय, खगडिया, भागलपूर, नालंदा आणि पाटणा, या जिल्ह्यांत मतदान होत आहे. दरम्यान मताचा वापर करुन लोक बदल नक्कीच घडवून आणतील, अशी प्रतिक्रिया तेजस्वी यादव यांनी मदतानानंतर दिली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram