Buddha Purnima : कोरोना संकटात गौतम बुद्धांच्या शिकवणीचा मोठा आधार : पंतप्रधान मोदी

Continues below advertisement

आज वैशाख बौद्ध पोर्णिमेनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून जगभरातील बौद्ध भिक्खुंशी संवाद साधला. या कार्यक्रमाचे आयोजन भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालय आणि आंतरराष्ट्रीय बौद्ध संघाच्या वतीनं संयुक्तपणे करण्यात आलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "जगासमोर हवामान बदलाचं संकट आवासून उभं आहे, धृवांवरील बर्फ वितळत आहे. जग एका मोठ्या संकटातून जात आहे. अशा वेळी गौतम बुद्धांनी सांगितलेला मार्ग महत्वाचा आहे. निसर्गाचा आदर करणे, पृथ्वीचे संवर्धन करणे ही गौतम बुद्धांची शिकवण आहे. जगभरातल्या मोठ्या अर्थव्यवस्थेपैकी असलेला भारतही शाश्वत विकासाच्या मार्गावर चालत आहे याचा अभिमान आहे."

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram