Gujarat CM : भूपेंद्र पटेल होणार गुजरातचे नवे मुख्यमंत्री,भूपेंद्र पेटल घाटलोदिया मतदारसंघातून आमदार

Continues below advertisement

Gujarat New CM: गुजरातच्या नवीन मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. भूपेंद्र पटेल गुजरातचे नवे मुख्यमंत्री बनले आहेत. केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नरेंद्र सिंह तोमर म्हणाले की, भूपेंद्र पटेल यांची भाजप विधिमंडळ पक्षाचे नवे नेते म्हणून निवड झाली आहे. आता भूपेंद्र पटेल गुजरातचे नवे मुख्यमंत्री असतील.

गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक गांधीनगर येथील भाजप कार्यालयात झाली. या बैठकीत नवीन मुख्यमंत्री निवडले गेले. नवे मुख्यमंत्री म्हणून भूपेंद्र पटेल यांची निवड करण्यात आली आहे. भूपेंद्र पटेल हे घाटलोडिया मतदारसंघातून आमदार आहेत. वास्तविक, विजय रूपाणी यांनी शनिवारी अचानक गुजरातच्या सीएम पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आज नवीन नाव निवडण्यात आले.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram