Gujarat Fire : भरुचमध्ये पटेल रुग्णालयात आग; आगीत 15 कोविड रुग्णांचा मृत्यू
Continues below advertisement
भरुच (गुजरात) : महाराष्ट्रात रुग्णालयातील दुर्घटनांच्या घटना ताज्या असतानाच, शेजारी असलेल्या गुजरात राज्यातही रुग्णालयात मोठी दुर्घटना घडली. भरुच जिल्ह्यातील कोविड केअर सेंटरमध्ये मोठी आग लागली. कोविड सेंटरमध्ये रात्री उशिरा लागलेल्या आगीत 15 जणांचा होरपळून मृत्यू झाला. रात्री साडेबाराच्या सुमारास ही आग लागल्याचं समोर आलं आहे.
भरुच जिल्ह्यातील पटेल वेलफेअर रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांसाठी कोविड केअर सेंटर बनवण्यात आलं होतं. तिथेच रात्रीच्या सुमारास मोठी आग लागली. आग लागल्यामुळे कोविड सेंटरमध्ये दाखल असलेल्या रुग्णांना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आलं. परंतु आग एवढी भीषण होती की त्यात 15 जणांचा मृत्यू झाला.
Continues below advertisement
Tags :
Gujarat Gujarat News Covid Hospital Gujarat Corona Gujarat Fire Bharuch Bharuch Hospital Fire