Pokharan Narendra Modi : 'भारत शक्ती' युद्धाभ्यासाला पंतप्रधान मोदींची उपस्थिती
Pokharan Narendra Modi : 'भारत शक्ती' युद्धाभ्यासाला पंतप्रधान मोदींची उपस्थिती राजस्थान दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदींनी पोखरणमध्ये आयोजित सैन्यदलाच्या 'भारत शक्ती' युद्धाभ्यासाला हजेरी लावली. भारतीय सैन्याच्या तिन्ही दलांकडून पोखरणच्या फायरिंग रेंजमध्ये या सरावाचं आयोजन करण्यात आलं होतं. टी-90 टँक, धनुष, एएलएच, रोबोटीक ड्रोन, लॉजिस्टिक्स ड्रोनसारख्या विविद स्वदेशी बनावटीच्या शस्त्रांची चाचपणी यावेळी करण्यात आली. पंतप्रधानांसह ३० देशांच्या प्रतिनिधींचीही या युद्धाभ्यासाला उपस्थिती होती.