2 ते 18 वयोगटातील लसीकरणाच्या चाचण्यांसाठी भारत बायोटेकची Covaxin लस वापरण्याची शिफारस : PTI

Continues below advertisement

नवी दिल्ली : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत लहान मुलांना लागण होण्याचं प्रमाण वाढत असल्याचं समोर आलं. कोरोना महामारीविरोधातील या लढाईत आता मुलांसाठी येत्या काही दिवसात चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. एका तज्ज्ञ समितीने मंगळवारी भारत बायोटेकची कोवॅक्सिन या स्वदेशी कोरोना प्रतिबंधक लसीची 2 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांवर चाचणीसाठी शिफारस केली आहे. दुसऱ्या/तिसऱ्या टप्प्याच्या चाचणीसाठी ही शिफारस करण्यात आली आहे. सूत्रांच्या हवाल्याने पीटीआय या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे.

ही चाचणी महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमधील मेडिट्रिना मेडिकल सायन्स इन्स्टिट्यूट, दिल्ली तसंच पाटण्यातील एम्ससह विविध ठिकाणी केली जाईल.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram