Bharat Biotech : 150 रुपयात प्रतिडोस लस सरकारला देणं परवडत नाही, भारत बायोटेकचं कंपनीचं पत्रक

Continues below advertisement

नवी दिल्ली : भारतात कोरोना लसीची निर्मिती करणाऱ्या भारत बायोटेक कंपनीने मंगळवारी सांगितले की, केंद्र सरकारला प्रति डोस 150 रुपये दराने कोरोनाची लस पुरवठा करणे फार काळ शक्य होणार नाही. केंद्राच्या पुरवठा शुल्कामुळे खासगी क्षेत्रातील किंमतीही बदलत आहे. भारतात खाजगी क्षेत्राला उपलब्ध असलेल्या इतर कोविड लसींच्या तुलनेत कोवॅक्सिन लसीचे जास्तीचे दर योग्य असल्याचे कंपनीने म्हटलं आहे. कमी प्रमाणात खरेदी, वितरणातील जास्त खर्च आणि किरकोळ नफा अशी अनेक व्यावसायिक कारणे आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram