Bank Strike : बँकांच्या संपामुळे कामकाजावर परिणाम, तब्बल 1 लाख कोटी रुपयांचे धनादेश रखडले
देशातील कामगार संघटनांनी पुकारलेल्या दोन दिवसांच्या संपामुळे वेगवेगळ्या क्षेत्रात परिणाम जाणवतोय. संपामुळे एकीकडे वीजेचं संकट निर्माण होण्याची शक्यता निर्माण झालीय. तर दुसरीकडे काल देशभरात एसबीआय आणि इंडियन ओव्हरसीज बँका वगळता अन्य राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखांचं कामकाजही ठप्प झालं. त्याचा परिणाम धनादेश वठवण्यावर झाला. बँक कर्मचाऱ्यांच्या संपामुळे काल एका दिवसांत तब्बल 1 लाख कोटी रुपयांचे धनादेश रखडले. दोन दिवसांच्या संपात काल पहिल्या दिवशी मोठ्या प्रमाणात धनादेश वठले नाहीत.