Bangalore Rains : बंगळुरुमध्ये मुसळधार पावसाचं थैमान, आयटी कंपन्यांचं तब्बल 225 कोटींचं नुकसान

आयटी सिटी अशी ओळख असलेल्या बंगळुरुला मुसळधार पावसाचा तडाखा बसलाय. जोरदार पावसामुळे बंगळुरुतील अनेक भाग जलमय झाले. गेल्या आठ वर्षात पहिल्यांदाच बंगळुरुमध्ये विक्रमी पावसाची नोंद झाली. या पावसामुळे अनेक भागात पाणी साचलं. रस्ते जलमय झाल्याचा फटका बंगळुरुमधील वाहतुकीलाही बसला. पाणी साचल्याने रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. तर या पावसामुळे बंगळुरुमधील आयटी कंपन्यांचं तब्बल २२५ कोटींचं नुकसान झाल्याचं समोर आलंय

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola