Ban On PFI : दहशतवादी संबंधांचा ठपका ठेवत केंद्र सरकारकडून पीएफआयसह 'या' संघटनांवरही बंदी
Continues below advertisement
Ban On PFI: दहशतवादी कारवायांमध्ये गुंतल्याचा ठपका असलेली पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) या संघटनेवर केंद्र सरकारने पाच वर्षांची बंदी घातली आहे (Ban On PFI) . केंद्र सरकारने याबाबतचा अध्यादेश जारी केला आहे. तपास यंत्रणांच्या शिफारसीवर गृहमंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. मागील काही दिवसांत केंद्रीय तपास यंत्रणांनी पीएफआयवर जोरदार कारवाई सुरू केली होती. राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA), ईडी (ED) यांच्यासह विविध राज्यातील तपास यंत्रणांनी पीएफआयच्या कार्यालयांवर 22 सप्टेंबर आणि 27 सप्टेंबर रोजी छापे मारले आहेत. केंद्र सरकारने पीएफआय शिवाय इतर संघटनांवरही बंदी घातली आहे.
Continues below advertisement
Tags :
Live Marathi News ABP Majha LIVE Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Maharashtra News NIA MARATHI NEWS . Raid India Abp Maza