Punjab Politics TV शी संबंधित सर्व App आणि Social Media अकाऊंट्सवर बंदीचे आदेश
Continues below advertisement
पंजाब पॉलिटिक्स टीव्ही या परदेशातील चॅनलच्या अॅप, वेबसाईट आणि सर्व सोशल मीडिया अकाऊंट्सवर बंदी घालण्याचे आदेश माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं दिले आहेत. सध्या सुरु असलेल्या विधानसभा निवडणुकीत या चॅनलनं सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय. पंजाब पॉलिटिक्स टीव्हीचा शिख फॉर जस्टिस या संघटनेशी संबंध असल्याचं समोर आलंय. या चॅनलनं सुरु केलेल्या नवे अॅप आणि सोशल मीडिया अकाऊंट्स सध्याच्या निवडणुकीत फायदा उठवण्यासाठी केल्याचंही आढळून आलंय. त्यामुळे माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं ही कारवाई केलीय.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Punjab Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Election Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv