Bajrang Punia : बजरंग पुनिया पद्मश्री सन्मान परत करणार, बृजभूषण समर्थक कुस्ती महासंघाचे अध्यक्ष

Bajrang Punia : बजरंग पुनिया पद्मश्री सन्मान परत करणार, बृजभूषण समर्थक कुस्ती महासंघाचे अध्यक्ष झाल्यानं निर्णय
कुस्तीपटू बजरंग पुनियानं आज आपला पद्मश्री सन्मान परत केलाय. नवी दिल्लीत पुनियाने पीएमओ कार्यालयाच्या गेटवर ठेवून हा पुरस्कार परत केलाय. भारतीय कुस्ती महासंघात भाजप खासदार बृजभूषण सिंह यांचं वर्चस्व आहे. सिंह यांनी राजीनामा दिला होता, त्यानंतर गुरुवारी त्यांचेच निकटवर्तीय संजय सिंह त्या अध्यक्ष पदावर निवडून आले. या निवडीने खेळाडूंमध्ये संतप्त आणि उद्विग्न प्रतिक्रिया उमटतायत. साक्षी मलिकनं काल कुस्ती सोडत असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर आज पुनियानं पद्मश्री परत केलंय. दरम्यान, पद्मश्री परत करणे हा पुनियाचा वैयक्तिक निर्णय असल्याचं क्रीडा मंत्रालयाच्या सूत्रांचं म्हणणं आहे. तरीही त्याचं मन वळवण्याचा आमचा प्रयत्न असल्याचंही सूत्रांनी सांगितलं. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola