Ayodhya Ram Temple Special Report : अयोध्येतील राम मंदिर कसं असेल ?
Continues below advertisement
Ayodhya Ram Temple Special Report : अयोध्येतील राम मंदिर कसं असेल ? अयोध्येत श्री रामाची मूर्ती बनविण्याचे काम सध्या सुरु आहे. डिसेंबरमध्येच ही मूर्ती तयार होईल. बालअवस्थेतील असलेल्या श्री रामलल्लाच्या एकूण तीन मूर्ती तयार केल्या जातं आहेत. तयार झालेल्या तीन पैकी एक मूर्ती निवडली जाईल))मूर्ती तयार झाल्यावर जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात ही मूर्ती सरयू नदीत अभिषेकासाठी नेली जाईल. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात हा विधी होणार आहे. त्यानंतर अयोध्येतील विविध मंदिरात रामलल्लाची मिरवणूक काढली जाईल. रामलल्लाची प्राचीन मूर्तीही अयोध्येत आहे. मात्र ही मूर्ती अगदी लहान असल्याने दर्शन घेणं सुलभ व्हावं म्हणून नवी मूर्ती तयार करण्यात आलीय. दोन्ही मूर्ती गर्भगृहातच असतील.
Continues below advertisement