Ayodhya Special Report:अयोध्येत तीन लाख भाविक दाखल;अधिकाऱ्यांवर का संतापले योगी आदित्यनाथ ?
Continues below advertisement
Ayodhya Special Report:अयोध्येत तीन लाख भाविक दाखल;अधिकाऱ्यांवर का संतापले योगी आदित्यनाथ ? बातमी अयोध्येतून.. राम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर आज सकाळी मंदिराचे दरवाजे उघडताच सर्व भाविक देवाचं दर्शन घेण्यासाठी मंदिरात पोहोचले.. रामाच्या दर्शनासाठी भक्तीचा महासागर लोटला होता.. कुठे चेंगराचेंगरी, कुठे ढकलाढकली तर कुठे बॅरिकेट्सवर चढून मंदिरात जाण्याचे प्रयत्न झाले.. प्रत्येक रामभक्ताला वेध लागले होते ते रामाच्या दर्शनासाठी आणि त्यासाठी गर्दीतून वाट काढण्याचा त्यांचा अट्टाहास सुरु होता.. पोलीसांच्या आवाक्याबाहेरची ही गर्दी होती. गर्दीचं व्यवस्थापन नीट न केल्यानं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ संबंधित अधिकाऱ्यांवर प्रचंड नाराज झाले. आणि त्यांनी थेट अयोध्या गाठलं पाहूया रामललाच्या दर्शनासाठी अयोध्येत कसं भगव वादळ आलंय...
Continues below advertisement