Ayodhya Ram Mandir Inauguration : रामाच्या प्राणप्रतिष्ठनेनंतर भाविकांमध्ये उत्साह, अयोध्येतून आढावा

Continues below advertisement

Ayodhya Ram Mandir Inauguration : श्रीराममंदिरात श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा, अयोध्येतून थेट आढावा 

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha PM Narendra Modi
 Speech :   राम म्हणजे आग नाही तर ती ऊर्जा आहे. राम म्हणजे भारताचा विचार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi Speech Ayodhya) यांनी म्हटले. अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठापनेनंतर पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात प्रभू श्रीरामाचा अर्थ उलगडून सांगताना भारतीय संस्कृतीमधील त्याचे महत्त्व अधोरेखित केले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'सियावर रामचंद्र की जय... असे म्हणत आपल्या भाषणाची सुरुवात केली. आज आपले राम आले आहेत. मला खूप काही बोलायचं आहे, पण कंठ दाठले आहेत. आजचा क्षण हा अलौकीक आणि पवित्र असल्याची भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली. 22 जानेवारी 2024 ही फक्त कॅलेंडरवरील तारीख नाही. नव्या कालचक्राचा उगम आहे. आजची वेळ सामान्य नाही. हजारो वर्षानंतरही आजच्या दिवसाची चर्चा होणार आहे, असेही त्यांनी सांगितले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram