Ayodhya Ram Mandir Dhwajarohan अयोध्यानगरी सजली, पंतप्रधान मोदींच्या हस्ते पार पडणार ध्वजारोहण सोहळा

Continues below advertisement

Ayodhya Ram Mandir Dhwajarohan अयोध्यानगरी सजली, पंतप्रधान मोदींच्या हस्ते पार पडणार ध्वजारोहण सोहळा 
अयोध्येत राम मंदिराच्या शिखरावर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे...या सोहळ्याची अयोध्येत जय्यत तयारी सुरू आहे...या सोहळ्यासाठी पंतप्रधान मोदी अयोध्येत 
दाखल झालेत..  राम मंदिराच्या शिखरावरील भव्य ध्वज ११ फूट रुंद आणि २२ फूट लांबीचा आहे... या सोहळ्याला 
सरसंघचालक मोहन भागवतांसह देशभरातील अनेक मान्यवरांची उपस्थिती  असणार आहे.. दुपारी १२ ते १२:३० दरम्यान मोदी ध्वजारोहण करतील.. या ध्वजावर भगवान श्री रामांच्या तेजस्वी आणि शौर्याचं प्रतीक असलेल्या तेजस्वी सूर्य तसंच कोविदार वृक्षाच्या प्रतिमेसह "ओम" लिहिलेलं आहे.  अयोध्या शहरातील अनेक भागात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.. अयोेध्या नगरीत मोठा बंदोबस्तही तैनात कऱण्यात आलाय... देशभरातून अनेक भाविक अयोध्या नगरीत दाखल होतायेत...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola