Partition Day : 14 ऑगस्ट 'फाळणी वेदना स्मरण दिन' म्हणून घोषित, पंतप्रधान मोदींची घोषणा
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 ऑगस्ट हा दिवस 'फाळणी वेदना दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान मोदींनी ट्विट करून हे सांगितले आहे. पंतप्रधान मोदींनी याचे कारणही दिले आहे. ते म्हणतात की या दिवशी आमच्या लाखो बहिणी आणि बांधवांना द्वेष आणि हिंसेमुळे विस्थापित व्हावे लागले. त्यांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ, 14 ऑगस्ट रोजी 'फाळणी वेदना दिन' साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान मोदींच्या या निर्णयाचे गृहमंत्री अमित शाह यांनी स्वागत केलं आहे.
पंतप्रधान मोदींनी ट्वीटमध्ये लिहलंय, "देशाच्या फाळणीची वेदना कधीही विसरता येणार नाही. द्वेष आणि हिंसेमुळे आमच्या लाखो बहिणी आणि बांधवांना विस्थापित व्हावे लागले आणि प्राणही गमवावे लागले. त्या लोकांचा संघर्ष आणि त्याग लक्षात ठेवून. 14 ऑगस्ट हा 'फाळणी वेदना दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. #PartitionHorrorsRemembranceDay चा हा दिवस आम्हाला केवळ भेदभाव, वैमनस्य आणि वाईट इच्छा यांचे विष काढून टाकण्यासाठी प्रेरणा देईल, सोबतच एकता, सामाजिक सौहार्द आणि मानवी संवेदनांनाही बळकट करेल."